पुणे : पुण्यातील (Pune News) इंदापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला आहे. लोखंडी रॉडनं गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आरोपीने सोबत आणलेली मीरचीची पूड देखील त्यांच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील संविधान चौकात ही घटना घडली आहे.
काय घडले नेमके?
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी आली असता हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने जोरदार हल्ला कोला. गाडीची तोडफोड करण्यात आली. सोबतच हल्लेखोराने आपल्यासोबत मिरचीची पूड देखील आणली होती. ती देखील पाटील यांच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवानं तहसीलदार यातून थोडक्यात बचावले आहेत.
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना… pic.twitter.com/8ro7ofHoId
— Supriya Sule (@supriya_sule) May 24, 2024
सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला निषेध
दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ‘इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध.’ असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना
Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार
Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता
Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट
Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत