अमरावती : राज्यात अपघाताचे (Amravati Accident News) प्रमाण वाढतच चालले आहे. त्यातच समृद्धी महामार्ग हा अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. समृद्धी महामार्ग जेव्हापासून वाहतुकीस खुला झाला आहे, तेव्हापासून अपघातांची मालिका सुरू आहे. या महामार्गावर आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. शासनाने यावर उपाय योजनाही केल्या. तरीदेखील अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. या महामार्गावर अजून एक अपघाताची घटना समोर आली आहे.
काय घडले नेमके?
दीक्षाभूमीला जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातामध्ये 14 जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चालकाला झोप आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.