राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदार संघासाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
सर्वच पक्षात तयारी करत असताना आज भाजपाला विदर्भात धक्का बसला असून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय.
राजकुमार बडोले हे 2009 ते 2019 पर्यंत भारतीय जनता पक्षाकडून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. 2019 ला राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी राजकुमार बडोले यांचा पराभव केला सध्या मनोहर चंद्रिकापुरे हे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जाईल आणि यामुळेच राजकुमार बडोले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.