मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यातील मतदान देशासह राज्याच्याही पाच मतदारसंघांमध्ये पार पडत आहे. यादरम्यान हवामान खात्याने (Weather Update) राज्याच्या काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा समावेश आहे. या ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
कोकणातील एकाकी भागात उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.उत्तर मध्य महाराष्ट्रातील एकाकी भागात उष्णतेची लाट. कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 kmph) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे pic.twitter.com/GDyZBKuAAN
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 18, 2024
तसेच मध्य महाराष्ट्रात प्रामुख्यानं नंदुरबार, नाशिक तर, मराठवाड्यात नांदेड आणि विदर्भातील बहुतांश भागांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच बरोबर कोकणातील काही भागांमध्येही पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार