नागपूर : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्ग (Cyclone Michaung) आज सकाळी 12 वाजण्यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हवामान विभागाच्या मते, या काळात 90 ते 110 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये वादळाचा प्रभाव जाणवेल. या राज्यांमध्ये एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मिचॉन्ग चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातदेखील जाणवणार आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यातील आद्रर्ततेचे प्रमाण वाढणार आहे. पुढील चार दिवस राज्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर आज आणि उद्या चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर
Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन