सिंधुदुर्ग : उजनी जलाशयात बोट उलटून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना (Sindhudurga News) आता वेंगुर्ल्यातही बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागच्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सिंधुदुर्गात पडत आहेत.
वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन जात असलेली बोट उलटली.या बोटीवर तेव्हा सात खलाशी होते. त्यातील तिघांनी पोहून किनारा गाठला. तर दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत तसेच अजून दोघेजण बेपत्ता आहेत. सध्या त्यांचा शोध सुरु आहे.
रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. बेपत्ता असलेल्या खलाश्या पैकी 1 खलाशी रत्नागिरीतील तर 3 खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजत आहे. बोट उलटल्यानंतर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे अद्याप बेपत्ता आहेत. सध्या त्यांचा शोध सुरु आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट
Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत