Nanded Accident

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

328 0

नांदेड : नांदेडमधून एक भीषण अपघाताची (Nanded Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामध्ये उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये पती-पत्नी आणि पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. नांदेड-बीदर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. शेख मोहसीन, फरिदा बेगम आणि शेख जुनेद असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
नांदेड – बीदर महामर्गावर झालेल्या अपघातात पती – पत्नी आणि पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील बिहारीपूर जवळ हा अपघात घडला . मुखेड येथील परतपूरचे रहिवासी असलेले 30 वर्षीय शेख मोहसीन आपली पत्नी फरिदा बेगम आणि पाच वर्षीय मुलगा शेख जुनेद यांना दुचाकीवरुन घेऊन मुखेडहून मुक्रमाबादकडे निघाले होते.

यादरम्यान नांदेड-बीदर महामार्गावरील बिहारीपूर येथे रस्त्यालगद उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर त्यांची दुचाकी आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये शेख मोहसीन आणि फरिदा बेगम यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याने आपला जीव सोडला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!