Accident News

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

858 0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरहून वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक (Accident News) दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहेत. अंबाला-दिल्ली हायवेवर मोहडाजवळ हा भीषण अपघात झाला. पहाटे 2 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

काय घडले नेमके?
या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मृतांमध्ये 6 महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश आहे. जखमी हायवेवर इकडे-तिकडे फेकले गेले होते. तर काही जखमी बसमध्येच अडकले होते. हायवेवरून जाणाऱ्यांनी तातडीने जखमींना मदत केली. यामध्ये काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कसा घडला अपघात?
अचानक ट्रेलरच्यासमोर एक वाहन आल्याने ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हलरला गाडी कंट्रोल न झाल्याने ती मागच्या बाजूने ट्रेलरला धडकली आणि हा अपघात झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!