मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे (Lifetime Achievement Award) आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा 14 जून रोजी मुंबईत पार पडणार आहे. तर यंदाच्या वर्षी हा पुरस्कार जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे.
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा -माहीम, मुंबई येथे सायंकाळी 4 वाजता होईल याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.
कोणाकोणाला मिळणार पुरस्कार ?
लीला मेहता पुरस्कृत भार्गवराम पांगे कार्यकर्ता पुरस्कार : गणेश तळेकर (नाट्य चळवळीसाठी विनामूल्य कार्याबद्दल)
डॉ. न. अ. बरवे स्मृती पुरस्कार – प्रशांत जोशी
कमलाकर वैशंपायन स्मृती पुरस्कार – दीपाली घोंगे
कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृती पुरस्कार – शशांक लिमये (उत्कृष्ट निवेदक)
बाळकृष्ण भोसले स्मृती पुरस्कार – विजय जगपात (गुणी रंगमंच कामगार)
वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षा पुरस्कार – संजय देवधर (समीक्षा)
अ. सी. केळुस्कर स्मृती पुरस्कार – गोविंद गोडबोले (बालरंगभूमीवरील योगदान)
कै. विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर आणि कै. भाई बोरकर स्मृती पुरस्कार – प्रायोगिक नाट्यसंस्था- अभिनय संस्था (कल्याण) – अभिजीत झुंझारराव
सर्वोत्कृष्ट नाट्य व्यवस्थापक – प्रणीत बोडके
नाट्य मंदार पुरस्कार – अशोक ढेरे
उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार – अशोक बेंडखळे
कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार – श्याम आस्करकर
विशेष पुरस्कार – स्व: रितेश सांळुके (कार्यकर्ता पुरस्कार)
सुनील बेंडखळे यांना लोककलावंत पुरस्कार
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता
Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट
Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत