Pune News

Pune News : आंब्याच्या झाडावर चढलेल्या तरुणाची अग्निशमन दलाकडून सुटका

862 0

पुणे : आज दुपारी ०३•४८ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात कोथरुड, पौड रोड, कृष्णा हॉस्पिटल जवळ, गल्ली क्रमांक ०३ येथे एका इमारतीच्या मागच्या बाजूस झाडावर एक इसम चढला असून तो अडकला आहे अशी वर्दी मिळताच दलाकडून कोथरुड अग्निशमन केंद्र येथील फायरगाडी व मुख्यालयातून रेस्क्यु व्हॅन रवाना करण्यात आली होती.

सदर घटनास्थळी जवान पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की, एका उंच आंब्याच्या झाडावर तीन फांद्याच्या मधोमध एक इसम सुमारे पस्तीस फुट उंच अडकलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच जवान दलाकडील शिडी झाडाला लावून झाडावर गेले आणि सदर इसमाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्याची शुध्द हरपली असून तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे जाणवले. त्याचवेळी तातडीने रश्शी, दोर याचा वापर करुन रेस्क्यु बेल्टच्या साह्याने तसेच त्याचे वजन अंदाजे शंभर किलोच्या आसपास असल्याने विषेश गाठीचा उपयोग करुन त्या इसमाला हळूहळू व कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत सुमारे ३० मिनिटात झाडावरुन खाली उतरवले आणि तातडीने अँब्युलंस मधून रुग्णालयात उपचाराकरिता रवाना केले.

सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, तांडेल आंगद लिपाणे, वाहनचालक महेश शिळीमकर, शरद गोडसे, फायरमन रोशन हरड, वैभव आवरगंड, रविंद्र बडे, प्रतीक पागसे, मारुती देवकुळे, कृष्णा नरवटे, महेश घुले, सुबोध भुतकर, परेश जाधव यांनी सहभाग घेतला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

T20 World Cup : रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? BCCI ने टीम जाहीर करताना दिले संकेत

Yamini Jadhav : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर

Pimpri Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये गावगुंडांची दहशत; अनेक वाहनांची केली तोडफोड

Pimpri-Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये भारतीय सैन्य दलाच्या वाहनाचा भीषण अपघात

T20 World Cup : T20 World Cupसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूंचे झाले कमबॅक

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत ३३.०९ टक्के मतदान

Posted by - April 28, 2023 0
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. दुपारपर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान…
Ravindra Shobhane

Sahitya Sammelan : अमळनेर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड

Posted by - June 25, 2023 0
पुणे : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) अमळनेर या ठिकाणी पार पडणार आहे. या संमेलनाच्या (Sahitya…
Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : आईची भेट राहिली अधुरी ! आजारी आईला भेटण्याआधीच तरुणाने घेतला जगाचा निरोप

Posted by - September 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आई आजारी असल्यामुळे…

63 वर्षीय रुग्णावर पुण्यातील लष्कराच्या कार्डिओथोरासिक सायन्सेस संस्थेतील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

Posted by - July 19, 2022 0
पुणे : येथील लष्कराच्या कार्डीओ-थोरॅसिक अर्थात हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या कार्डीओ-थोरॅसिक सायन्सेस या संस्थेतील डॉक्टरांनी एका 63 वर्षीय माजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *