Ravindra Shobhane

Sahitya Sammelan : अमळनेर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड

895 0

पुणे : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) अमळनेर या ठिकाणी पार पडणार आहे. या संमेलनाच्या (Sahitya Sammelan) अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे रविवारी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत रवींद्र शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावे या अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. यामध्ये डॉ. रवींद्र शोभणे यांचे नाव बहुमताने निवडण्यात आले. 2,3 आणि 4 फेब्रुवारी रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी दिली आहे.

ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांच्याविषयी?
कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला. नरखेड तालुक्यात खरसोली या गावी त्यांचा जन्म झाला. याच गावातील आदर्श विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण नरखेड येथे तर पदव्युत्तर शिक्षण नागपूर येथील मॉरिस महाविद्यालयामध्ये केले. 1989 मध्ये त्यांनी पीएच.डी. ची पदवी मिळवली. कथालेखक म्हणूनही ते परिचित आहेत. 1991 मध्ये त्यांचा ‘वर्तमान’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला.डॉ.रवींद्र शोभणे यांना अनेक प्रकारचे सन्मान मिळाले आहेत. यापूर्वी यवतमाळमधील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषवले होते. सन 2007 ते 2012 यादरम्यान त्यांनी मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्यपद सांभाळले होते.

History Of Indian Controversial Movie : भारतातील ‘हा’ पहिला चित्रपटही अडकला होता वादाच्या भोवऱ्यात? काय होतं कारण

अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) 1878 मध्ये प्रथम पुणे शहरात झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे होते. अमळनेरमध्ये पहिले संमेलन कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली 1952 मध्ये झाले होते. त्यानंतर आता अमळनेर 2024 मध्ये दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे.

Share This News

Related Post

महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीराजेंच्या फसवणुकीचा निषेध ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

Posted by - March 21, 2022 0
महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासन पूर्ततेबाबत श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांची फसवणूक केल्याचा आपण निषेध व्यक्त करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …

#CYBER CRIME : लग्नाचं द्यायचा वचन.., सोशल मीडियावर बनावट अकाउंट बनवून अशी केली अनेक महिलांची लाखो रुपयांची फसवणूक

Posted by - February 21, 2023 0
सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून महिलांची मैत्री करायचा आणि त्यानंतर त्यांच लग्नाचे वचन देऊन त्यांच्याकडून लाखो रुपयांचा अपहार करायचा.भवरकुवा…

अभिजीत बिचुकलेंची अजब गजब मागणी ; म्हणे, ” माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा…! ” कारण ,

Posted by - February 23, 2023 0
पुणे : सध्या अभिजीत बिचुकले हे कसबा विधानसभा पोट निवडणुकीचे उमेदवार आहेत. आपल्या अजब गजब वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत…
Eknath Shinde

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; GR काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Posted by - September 6, 2023 0
मुंबई : मराठ्यांचा कुणबीत समावेश करुन त्यांना OBC कोट्यातून आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला…

पंढरपूर:’सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 10, 2022 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ पुरस्काराचे वितरण पंढरपूर:सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला ‘सुंदर माझे कार्यालय’ हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *