हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत ३३.०९ टक्के मतदान

1831 0

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. दुपारपर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान झाले आहे.

निवडणुकीत एकूण ५७ उमेदवार रिंगणात असून १७ हजार ७४६ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. ४ मतदान केंद्रातील ३१ मतदान बुथवर मतदान प्रक्रिया सुरु आहे. वीस वर्षांनंतर ही निवडणूक लागल्याने या निवडणुकीला खूप महत्त्व आले आहे. या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, आडते -व्यापारी, हमाल मापारी या चार गटातील उमेदवार रिंगणात आहेत.

सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार या दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. व्यापारी आडते मतदार संघातून २ जागेसाठी सर्वाधिक मतदार आहेत . यामध्ये १२ उमेदवार रिंगणात उतरले असून जय शारदा गणेश पॅनल व जनशक्ती पॅनल व व्यापारी विकास पॅनल यामध्ये खरी लढत आहे. तर तर हमाल मापाडी या संघातून एक जागेसाठी ५ जण रिंगणात आहेत. यामध्येही चुरस सुरू आहे.

मतदान केंद्रावर मतदारांची एकच गर्दी झाली आहे. यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारपर्यंत दोन तासात १३ टकक्यांपर्यंत मतदान झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी सांगितले.

Share This News

Related Post

Pune Accident

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात

Posted by - December 29, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune Accident) जांभुळवाडी येथील नवीन कात्रज बोगद्यात कार आणि एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये…

पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - May 28, 2023 0
भारतीय संस्कृतीत नृत्यकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल पुणे विद्यापीठात…

मिनी लोकसभेचा आज फैसला ; राजकीय प्रतिष्ठा पणाला

Posted by - March 10, 2022 0
राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश,…
parth pawar

मोठी बातमी! अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Posted by - April 23, 2024 0
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकार…

मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडी दोन दिवसांची वाढ; वकिलांनी काय युक्तिवाद केला वाचा सविस्तर 

Posted by - July 20, 2024 0
मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडी दोन दिवसांची वाढ; वकिलांनी काय युक्तिवाद केला वाचा सविस्तर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *