मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Maharashtra Politics) प्रचार जोरदार सुरु असताना दुसरीकडे महायुतीने काही जागांवर आपला उमेदवार घोषित केला नव्हता. अखेर आज महायुतीकडून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. शिवसेनेकडून ठाण्यात नरेश म्हस्के यांना तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्री. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्री. नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/XYJjTUy0r8
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची लढत होईल. तर ठाण्यात नरेश म्हस्के यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून राजन विचारे मैदानात आहेत. त्यामुळे आता या दोन्ही मतदार संघात शिवसैनिकांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.