Railway

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार

291 0

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने असिस्टंट लोको पायलटच्या (RRB ALP Recruitment 2024) पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. 20 जानेवारीपासून या भरतीला सुरुवात होणार आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.चला तर या भरतीसंदर्भात सविस्तर जाणून घेऊया…

काय आहे निवडप्रक्रिया?
या पदासाठी उमेदवारांची तीन टप्प्यात परीक्षा होईल. प्रथम संगणक आधारीत चाचणी होईल. त्यानंतर संगणक आधारित अभियोग्यता चाचणी घेतली जाईल. अखेरच्या टप्प्यात उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होणार. वैद्यकीय चाचणी उतीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

वय आणि पगार
अधिसूचनेनुसार, उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 19 हजार 900 रुपये पगार दिला जाईल.

अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, एससी, एसटी, माजी सैनिक, पीडब्लूडी, महिला आणि तृतीथपंथी श्रेणीतील उमेदवारांकडून 250 रुपये अर्ज शुल्क घेतले जाणार आहे.

अर्ज कसा करायचा?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने प्रथम भारतीय रेल्वेची अधिकृत साइट IndianRailways.gov.in वर भेट द्यावी. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील रेल्वे भरती पर्यायावर क्लिक करून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

किती पदांसाठी होणार भरती?
भारतीय रेल्वेच्या या भरती अंतर्गत असिस्टंट लोको पायलटच्या एकूण 5 हजार 996 पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्‍यासाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात आयटीआय किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद

Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट

Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे जाहीर

Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Vilas Tapkir : धनकवडी भागातील सामाजिक कार्यकर्ते विलास तापकीर यांचे निधन

Parbhani Crime : परभणी हादरलं ! पळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला गेल्याने पत्नीची भररस्त्यात हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!