नागपूर : नागपुरातून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सेमिनरी हिल्स परिसरातील एका घराला आग लागल्याने दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काल रात्री 10 वाजताच्या सुमारास सेमिनरी हिल्स परिसरातील हजारीपहाडमधील गौरखेडे कॉम्प्लेक्समध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. देवांश उईके (7 वर्ष) आणि प्रभास उईके (2 वर्ष) अशी मृत पावलेल्या भावांची नावे आहेत.
काय घडले नेमके?
आई दिपाली कामानिमित्त बाहेर गेली असता थंडीपासून बचाव करण्यासाठी मुलांनी घरात शेकोटी पेटवली. यानंतर या शेकोटीचा भडका उडाला आणि संपूर्ण घराला आग लागली. घरात या दोन भांवडासोबत त्यांची 10 वर्षांची बहिणीदेखील होती. आग लागल्यावर चिमुरड्यांनी आरडाओरडा केला पण त्यांचा आवाज कोणालाही ऐकू आला नाही. त्यांच्या बहिणीने कसाबसा आपला जीव वाचवला पण देवांश आणि प्रभास यांचा आगीच्या भडक्यात होरपळून मृत्यू झाला.
दरम्यान मुख्य रस्त्यावरून एका व्यक्तीला आगीचे लोट दिसले. त्याने घटनास्थळी धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अग्निशमन विभाग आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचं काम सुरू होतं. दोन्ही भावांना बाहेर काढण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद
Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट
Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…
Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन
Vilas Tapkir : धनकवडी भागातील सामाजिक कार्यकर्ते विलास तापकीर यांचे निधन