राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन

197 0

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावेश आहे.

राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात स्वायत्तता आणि उत्कृष्टता सक्षम करणे, शाळांपासून कौशल्य विकास तसेच उच्च आणि तांत्रिक शिक्षणापर्यंतच्या सर्व शैक्षणिक बाबींवर लक्ष केंद्रित करणाऱ्यासाठी हा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. राज्य स्तरावरील सर्व शिक्षण संस्था आणि विभागांना, पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षण संस्थांपर्यंत यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील दृष्टिकोनानुसार, गुंतवणुक आणि संसाधने यांचा मेळ घालण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे.

या कार्यगटाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून सदस्यपदी उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कृषी मंत्री तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव समितीचे सदस्य सचिव आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम सनियंत्रणासाठी म्हणून हा कार्यगट काम करेल. डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशींनुसार विविध विषयांवर स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेणे व धोरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या नवनवीन बदलांबाबत चर्चा, विषय समित्यांच्या अहवालातील शिफारशींनुसार विभागामार्फत करण्यात आलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेणे तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणात करावयाचे बदल याविषयी धोरणात्मक चर्चा करणे अशी या कार्यगटाची कार्यकक्षा असणार आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक बातमी : तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या… येशूचं रक्त प्या आणि पूजा करा ! आळंदीत धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न; पोलिसांत तक्रार दाखल

Posted by - January 6, 2023 0
आळंदी : आळंदीतून एक धक्कादायक बातमी… आळंदीत काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेल्याची घटना उघडकीस आलीये. या प्रकरणी…

राज्यात लवकरच 7 हजार पोलिसांची भरती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - August 24, 2022 0
मुंबई : राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री…
nirmala sitaraman

CAIT ने अर्थमंत्री सीतारामन यांना पेय पदार्थांवरील कर कमी करण्याची केली विनंती

Posted by - May 9, 2023 0
पुणे : किराणा स्टोअर्स, जनरल स्टोअर्स, पान शॉप्स आणि फेरीवाले यांसारख्या छोट्या किरकोळ विक्रेत्यांचे समर्थन करत, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया…

भूषण देसाई हातात घेणार धनुष्यबाण; सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक !

Posted by - March 13, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई हे एकनाथ…
Jayant Patil

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *