‘खोका’ उल्लेख करणाऱ्याला अटक करून खोक्याचे समर्थनच- अजित पवार

876 0

खोके यावरून रॅप साँग करणाऱ्याला जेलमध्ये टाकले. त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एक प्रकारे समर्थन केले आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित, ‘ धडपड ‘ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अजित पवार बोलत होते.

यावेळी ॲड. अमरसिंह जाधवराव, ज्ञानेश्वर भोईटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, चंद्रकांत भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, “सध्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. सध्या घडत असलेल्या घटना पाहता अघोषित आणीबाणी येत आहे की काय असा प्रश्न पडतो. कोकणात पत्रकाराची हत्या झाली. मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते दम देतात. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये खोके यावरून रॅप साँग करणाऱ्याला जेलमध्ये टाकले. खोका हा उल्लेख केला परंतु, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एक प्रकारे समर्थन केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकाराला शाई फेकीच्या गुन्ह्यात गोवले गेले. तेव्हा पत्रकारांनी एकजूट केल्यावर त्या पत्रकाराला गुन्ह्यातुन वगळले गेले. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने घातक असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही. सुसुंकृत महाराष्ट्रात हा प्रकार एक शोकांतिका असून, असे हिणकस प्रकार थांबले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी एकजूट करण्याची गरज आहे. म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये. यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत”

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची संघर्ष गाथा धडपड या पुस्तकामधून मांडली आहे. केवळ राजकारणी व्यक्तींच नव्हे तर समाजकारणात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. पुस्तकाचे लेखक श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविक केले, प्रदीप देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Share This News

Related Post

Shubham Pawar

Maratha Reservation : ‘माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका’; म्हणत मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

Posted by - October 22, 2023 0
नांदेड : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पेटला आहे. या आरक्षणासाठी जरांगे…

#BOLLYWOOD : ‘इतके पैसे घेऊन काय उपयोग की पँटशिवाय बाहेर जावे लागते… ?’ पॅन्ट न घालताच शमिता शेट्टी पडली बाहेर आणि झाली तुफान ट्रोल

Posted by - February 10, 2023 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण आणि ‘बिग बॉस 15’ फेम शमिता शेट्टी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने…
Yavatmal Crime

Yavatmal Crime : शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या पिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसेने दिला चोप

Posted by - March 15, 2024 0
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून समोर आली आहे.…
Freedom of Information

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Posted by - January 8, 2024 0
पुणे : माहिती अधिकार कट्ट्याचा (Freedom of Information) दहावा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. यावेळी माहिती अधिकार कट्ट्याचे संस्थापक…

क्रिकेटर ते बिहारचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री; कशी आहे तेजस्वी यादव यांची राजकीय कारकीर्द

Posted by - August 10, 2022 0
पाटणा: भाजपासोबत फारकत घेत नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद बरोबर संसार थाटला असून नितीशकुमार यांनी आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *