मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यालाही मान्सून (Monsoon Update) कधी येणार याची प्रतिक्षा लागली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला आहे. यंदा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहात आहेत. यादरम्यान हवामान विभागाने यंदा मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तवला आहे.
28 मे पर्यंत मान्सून केरळपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झालं आहे.12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एखाद दोन दिवस पुढे देखील जाऊ शकतात. मान्सून 19 मे रोजी अंदमानमध्ये धडकणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे.
मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 12 जूनच्या आसपास सक्रिय होईल. गेल्यावर्षी राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होता. यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.