Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं! दरोडेखोरांनी पतीला दिला गळफास, अन् पत्नीसोबत…

90347 0

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यानंतर एकाची ओढणीच्या सहाय्याने हत्या देखील केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आरोपींनी घरातील ऐवज घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.

काय घडले नेमके?
श्रीरामपूरच्या एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी घरात घुसून एका विवाहित युवकाची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली आहे. नईम पठाण असे 33 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. मृत नईमची पत्नी रात्री लघुशंकेला घराबाहेर आली असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या पाच दरोडेखोरांनी तिला फरफटत घरात आणून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा होताच, दरोडेखोर घरात आल्याचे नईमच्या लक्षात आले. मात्र काही करायच्या आतच दरोडेखोरांनी नईमला घरातील लहान बाळांच्या झोक्यासाठी बांधलेल्या ओढणीने गळफास दिला आणि त्याची निर्घृणपणे हत्या केली.

यानंतर या दरोडेखोरांनी घटनास्थळावरून सात लाख रुपये आणि सोने-चांदी असा ऐवज लंपास केला. धक्कादायक म्हणजे या आरोपी दरोडेखोरांमध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत दरोड्याच्या तपास सुरू केला.

Share This News

Related Post

MHT CET Result

MHT CET परीक्षेचा निकाल 12 जून रोजी; सकाळी 11 वाजता होणार जाहीर

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (MHT CET Result 2023) अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी…
Crime Video

Crime Video : ताजमहाल बघायला गेलेल्या पर्यटकाला मारहाण; Video आला समोर

Posted by - July 18, 2023 0
आग्रा : आग्र्यात ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाला बेदम मारहाण (Crime Video) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही…
Mumbaicha dabewala

Dasara Melava : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार नाही; मुंबईच्या डबेवाल्यांचा मोठा निर्णय

Posted by - October 24, 2023 0
मुंबई : दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) आधी ठाकरे गटासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या मेळाव्याला न जाण्याचा निर्णय…

सावित्रीबाई फुले यांची प्रतिकात्मक स्वरूपाची शाळा(व्हिडीओ)

Posted by - March 10, 2022 0
‘खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!’ स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त…
shinde and uddhav

Supreme Court : 2 आठवड्यात उत्तर द्या; कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *