Crime News

Crime News : शेतात काम करताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

616 0

यावल : जळगावमधील यावल तालुक्यातून एक धक्कादायक (Crime News) घटना समोर आली आहे. यामध्ये शेतात काम करत असताना एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये शेतात एका ड्रायव्हरचा रोटावेटरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावल तालुक्यातील डांभुर्णी गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. विजय जानकीराम कोळी बाविस्कर (वय 35) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
शेतात रोटर चालवत असताना ड्रायव्हरचा मागील बाजूला तोल गेला. यामुळे विजय बाविस्कर हे रोटरमध्ये अडकले. क्षणातच त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Monsoon Update : महाराष्ट्रात कधी येणार मान्सून? हवामान विभागाने दिला ‘हा’ अलर्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!