पाटणा: भाजपासोबत फारकत घेत नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद बरोबर संसार थाटला असून नितीशकुमार यांनी आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी तेजस्वी यादव यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
बिहारचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होणाऱ्या तेजस्वी प्रसाद यादव यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९८९ रोजी झाला.
कशी आहे तेजस्वी यादव यांची राजकीय कारकीर्द
- 2015 साली राघोपुरमधून तेजस्वी यादव विधानसभेची निवडणूक जिंकून आमदार झाले. ही त्यांची पहिली निवडणूक होती.
- त्यावेळी नीतीश कुमार आणि लालू यादव यांनी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. निवडणुकीत त्यांच्या युतीचा विजय झाला आणि पहिल्यांदा आमदार बनलेले तेजस्वी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.
- दोन वर्षंही उलटली नसतील. नीतीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी केली आणि 16 महिन्यातच तेजस्वी यांना उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर विधानसभेत ते विरोधीपक्षनेते बनले.
- फक्त इयत्ता आठवीपर्यंत शिकलेले तेजस्वी यादव हे मूळचे क्रिकेटपटू आहेत. झारखंडमधून ते रणजी करंडकासाठी खेळले आहेत. शिवाय दिल्ली डेअरडेविल्समधूनही ते खेळले आहेत.
- बिहार निवडणुकांवेळी लालूप्रसाद यादव तुरुंगात आहेत. त्यांच्या गैरहजेरीत तेजस्वी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी सर्वाधिक 251 प्रचारसभा घेऊन प्रचाराचं रान उठवलं होतं.
- तेजस्वी यादव यांच्यादेशतील शातील सर्वात तरुण उपमुख्यमंत्री मंत्री नवा रेकॉर्ड तयार झाला आहे.