Pune News

Pune News : आईसोबतचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीदरम्यान 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

85629 0

पुणे : पुण्यासह (Pune News) पिंपरी-चिंचवडमध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त अनेक ठिकाणी उत्साहाला उधाण आलं होतं. बाप्पाचे वाजत-गाजत गणेश विसर्जन करण्यात येत होते. यादरम्यान पिंपरी-चिंचवडमधील मोशी इथे गणपती विसर्जन सुरू उत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडयेथे एका 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्णव आशिष पाटील असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

काय घडले नेमके?
अर्णव पाटील हा मोशी येथील मंत्रा सोसायटीमध्ये राहत होता. गणेश विसर्जनाच्या दिवशी सोसायटीतील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी तो आला होता. पाण्याच्या टाकीच्या शेजारी उभा राहून तो विसर्जनाची मिरवणूक पाहत होता. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. यादरम्यान अर्णवचा तोल गेला आणि त्याचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ज्यावेळी घटना घडली तेव्हा सोसायटीच्या आवारात लेझीम नृत्य सुरू होते. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाचत असतानाच अर्णव हा टाकीत पडला. सारेच मिरवणुकीत दंग असल्याने अर्णव टाकीत पडल्याचे कोण्याचाच लक्षात आलं नाही. यासंबंधी एक व्हिडिओही समोर आला आहे. तर, सोसायटीतील कार्यक्रमासाठी अर्णव छान तयार होऊन आला होता. अर्णव आणि त्याच्या आईनेसोबत सेल्फीही काढला होता. त्यांच्या हा सेल्फी अखेरचा ठरला आहे. अर्णवच्या मृत्यूमुळं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Daund Accident

Daund Accident : कुस्ती खेळण्यासाठी जाणाऱ्या पैलवानांचा टेम्पो उलटल्याने भीषण अपघात

Posted by - March 21, 2024 0
पुणे : पुण्यातील दौंडमधून एक भीषण अपघाताची (Daund Accident) घटना समोर आली आहे. या अपघातात कुस्ती खेळण्यासाठी चाललेले पैलवान जखमी…
Shivsena Logo

Shivsena Demand : बांगलादेशी नागरिकांसह परदेशी नागरिकांवर तातडीने कारवाई करावी; शिवसेनेची पुणे पोलिस आयुक्तांकडे मागणी

Posted by - July 29, 2023 0
पुणे : पुणे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील महत्त्वाचे शहर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे सुविख्यात आहे. गेल्या काही दिवसापासून…

कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप,९ जणांची निर्दोष सुटका

Posted by - May 5, 2022 0
पुणे- उरळीकांचन येथील कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी ६ आरोपीना जिल्हा स्तर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर ९…
Pune News

Pune News : आम आदमी पक्षाची “बसमित्र” संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार

Posted by - December 7, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या तसेच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *