Supriya Sule

Supriya Sule : कात्रज कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात : सुप्रिया सुळेंची मागणी

303 0

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडीमिशन पोलीस चौकीपासून जवळच झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी होती असल्याने येथे कायमसावरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे. आज झालेल्या अपघातात कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे त्याचा धक्का बसून आठ वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये स्कुल बसचाही समावेश आहे. शिवाय एका व्यक्तीला प्राण गमावावे लागले. या अपघातामुळे जवळपास दोन तीन तास वाहतूक ठप्प झाली होती,असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

अपघात जेथे झाला ती जागा उताराची अरुंद असून अपघातप्रवण आहे. येथे सातत्याने दुर्दैवी घटना घडतात. यापूर्वीही अनेक नागरीकांना याठिकाणी झालेल्या छोट्या मोठ्या अपघातांत गंभीर स्वरुपाच्या दुखापतींना सामोरे देखील जावे लागले आहे. हे रोखण्यासाठी येथे कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत पालकमंत्री पुणे आणि शासनाने सकारात्मक विचार करावा, असे खासदार सुळे यांनी पुढे नमूद केले आहे.

Share This News

Related Post

मोठी कारवाई : पुणेकर खात होते भेसळयुक्त तूप ? अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने भेसळयुक्त तुप बनविणाऱ्या विरुद्ध कारवाई

Posted by - August 11, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने आंबेगाव बु. पुणे येथील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या विकी कुमार बिल्डींग मधील गोदाम जवळील पेढीवर…

PUNE CRIME : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम ; झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने खुनी हल्ला

Posted by - January 17, 2023 0
पुणे : कोयता गॅंगने पुन्हा एकदा पुण्यामध्ये धुडगूस घातला आहे. शिवाजीनगर जवळील एका मैदानावर झोपलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर तरुणांनी कोयत्याने…
Accident News

Accident News : ट्रकचालकाकडून झाली ‘ती’ चूक अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं

Posted by - May 8, 2024 0
माधोपूर : आपली एक चूक किती महागात पडू शकते (Accident News) याचा प्रत्यय देणारी एक घटना दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली…

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे होणारे आजार कोणते..? जाणून घ्या

Posted by - March 21, 2022 0
1) उष्माघात – मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते त्यापेक्षाही वातावरणातील तापमान वाढलेले असते. पुण्यात कमाल तापमान चाळिशीच्या…

व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजना प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

Posted by - July 14, 2022 0
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व पात्र विभागांनी व्यायामशाळा विकास व क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा लाभ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *