पुणे : आज पहाटेच्या सुमारास खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलमध्ये आग (Pune Fire) लागल्याची वर्दी नियंत्रण कक्षात मिळताच येरवडा अग्निशमन केंद्र येथून एक फायरगाडी व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आला होता.
घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी प्रथम हॉटेलमध्ये कोणी कामगार नसल्याची खाञी हॉटेल मालक यांच्याकडून करत आगीवर पाण्याचा मारा सुरु केला व वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवत कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले. हॉटेलच्या भटारखान्यातून जवानांनी सहा सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला. तसेच वेळीच आग विझवल्याने आग इतरञ पसरली नाही.
सदर आगीचे नेमके कारण समजले नसून या आगीमध्ये दोन ओव्हन, सात फ्रिज, टिव्ही, कंप्यूटर, इलेक्ट्रीक वायरिंग व इतर साहित्य जळाले. या ठिकाणी कोणी जखमी वा जिवितहानी झालेली नाही.सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव तसेच वाहनचालक सुनिल धुमाळ,सुयोग देवळे आणि फायरमन विष्णु जाधव, उत्तम खांडेभराड, श्रीराम कराड, आदिनाथ फेगडे, अनिकेत साळवे यांनी सहभाग घेतला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : बेकायदेशीर रित्या जमाव जमा केल्याने भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Maharashtra Rain : अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल