Video

Video: मरणानंतरही नरक यातना! रस्ता नसल्याने मृतदेह चक्क झोळीतून नेण्याची आली वेळ

385 0

नांदेड : एकीकडे आपला देश प्रगतीच्या दिशेने प्रवास करत असताना आता नांदेडमधून (Video) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह गावकऱ्यांना चक्क झोळी करुण आणावा (Video) लागला. किनवट तालुक्यातील जगदंबा तांडा या गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गावाला रस्ता नसल्यामुळे मृतदेह झोळीतून नेण्याची वेळ आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
जगदंबा तांडा येथे 25 ते 30 कुटूंबांची लोकवस्ती आहे. शेतकरी, शेतमजुर अशी या तांड्याची ओळख आहे. तिथे संतोष चव्हाण या युवकाचा मृत्यू झाला होता. रस्ताअभावी गावकऱ्यांना झोळी करुण त्याचा मृतदेह गावात आणावा लागला. शिवाय अंत्यविधीसाठी देखील मृतदेह झोळीतून नेण्यात आला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

यापूर्वी तांडावासियांनी गावातील रस्ता करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे मागणी केली होती. परंतु, दखल घेतली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Amitesh Kumar

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Posted by - May 24, 2024 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन्स केसची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर…

म्हणून…. राहुल गांधींनी धरला पूनम कौरचा हात

Posted by - October 30, 2022 0
तेलंगणा: काँग्रेस नेते राहुल गांधी एका अभिनेत्रीचा हातात हात धरून चालताना दिसल्यामुळं सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो…
Poster

Poster : राज आणि उद्धव एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंड करून विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत…

Breaking ! मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात, सर्वजण सुखरूप

Posted by - April 3, 2023 0
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अलिबाग जवळील मांडवा येथे अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक ! शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच्या बंडखोरीने राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर काळे ढग जमा झालेले आहेत. या बंडखोर आमदारांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *