पुणे : कोयता गॅंगने पुन्हा एकदा पुण्यामध्ये धुडगूस घातला आहे. शिवाजीनगर जवळील एका मैदानावर झोपलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर तरुणांनी कोयत्याने खुनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असल्याचे समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर जवळील एका मैदानावर झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकावर काही तरुणांनी कोयत्याने खुनी हल्ला केला. हा हल्ला पूर्व-वनस्यातून झाला असल्याच समजत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बाचाबाचीमुळे या तरुणांनी जेष्ठ पती-पत्नीवर कोयत्याने जबरदस्त हल्ला केला.
फिर्यादी सतीश काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाद्या बगाडे, दिपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. शिवाजीनगर पोलीस पथक आरोपींचा शोध घेत आहेत.