Ajit Pawar

Ajit Pawar : पुणे पॉर्शे अपघातानंतर अजित पवार पहिल्यांदाच माध्यमांसमोर; म्हणाले कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी..

478 0

पुणे : पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने दारू पिऊन गाडी चालवत दोघांना चिरडल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची देशात दखल घेतली गेली. मात्र एवढी मोठी घटना घडली असतानादेखील पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली नव्हती. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. यानंतर आज अजित माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले अजित पवार?
‘21 तारखेला सकाळी 9 वाजता मंत्रालयात चेक करायचं, अजित पवार मंत्रालयात होता का नाही? आणि माझी कामं काय चालली होती. कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता, ही घटना अतिशय गंभीर आहे. अशाप्रकारच्या गोष्टी कदापी घडता कामा नये. कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं पोलिसांचं काम आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सीपी मला वेळोवेळी माहिती देत होते. सीपींशी मी सकाळीही बोललो, त्यांच्यासोबत चर्चा केली. मिनिट टू मिनिट त्यांनी मला सांगितलं’, असं अजित पवार म्हणाले.

तसेच ‘बेल न्यायालयाने का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे. कडक भूमिका घेऊन गोष्टी केल्या पाहिजेत तशा केल्या आहेत. पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झाला, कोणताही राजकीय हस्तक्षेप झाला नाही. गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि माझंही बारकाईने लक्ष आहे’, असं अजित पवारांनी सांगितलं. कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी त्याला सोडलं जाणार नाही, असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.

‘पुण्याच्या परिसरात अनधिकृतपणे पब संस्कृती वाढली आहे. त्याविरोधात जोरात अ‍ॅक्शन सुरू करण्यात आली आहे. मी मीडियासमोर आलो नाही, माझं माझं काम सुरू आहे. चुकीच्या कामाला माझा जबरदस्त विरोध असतो, मी सरकारमध्ये असलो तरी आणि नसलो तरी. यात कडक कारवाई केली पाहिजे, पोलिसांनीही वेडेवाकडे प्रकार करू नये, राजकीय नेत्यांनीही करू नये’, असेदेखील अजित पवार म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dombivli Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Election 2024 : विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा; ‘या’ दिवशी होणार मतदान

Vishal Agarwal : विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Accident News : धक्कादायक ! फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं.. CCTV फुटेज आलं समोर

Pune Accident : विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; ‘हे’ 2 नवीन कलम लावण्यात येणार

Pune News : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताकडून हल्ला; रॉडने केली गाडीची तोडफोड

Pune News : पुणे शहर पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करावी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

Laila Khan Murder Case : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी वडिलांना कोर्टाने सुनावली फाशी

Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना

Medha Kulkarni : ब्लॅक या पब च्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Lifetime Achievement Award : अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Ratnagiri Accident

Ratnagiri Accident : दापोलीत भीषण अपघात ! 8 जण ठार तर 7 जण जखमी

Posted by - June 26, 2023 0
रत्नागिरी : राज्यात सध्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. रत्नागिरी (Ratnagiri Accident) जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर रविवारी संध्याकाळी मॅक्झिमो आणि…

विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून नुकसान ग्रस्त भागांची पाहणी; राज्य सरकारकडे ‘ही’ केली मागणी

Posted by - July 15, 2022 0
राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. उभी पिकं पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले…

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा ऑनलाईन पाहता येणार; राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted by - May 26, 2022 0
पुणे – बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक…

महायुतीत वादाची ठिणगी पडणार? अजित पवारांच्या ‘या’ भूमिकेनं शिंदे गटाची अडचण होणार

Posted by - August 20, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादी त उभी फूट पाडत अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले आणि भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट…
Tanisha Bormanikar

Tanisha Bormanikar : बारावी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत तनिषा बोरामणीकर आली अव्वल

Posted by - May 21, 2024 0
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. यात राज्यातील मुलींनी पुन्हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *