Deepfake Technology

Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश

314 0

पुणे : लोकसभा निवडणुकीदरम्यान (Loksabha) डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा चिंतेचा विषय आहे. एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात. असे गैरपद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते.

निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. राज्य शासनामार्फत पोलीस महासंचालकांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून पोलीस खात्यामार्फत यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानेही विपर्यस्त माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News

Related Post

Katewadi Gaon

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ काटेवाडीमधील ग्रामस्थ आले एकत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - June 11, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी बारामतीकरांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार…

गंगाधाम चौक येथील आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांची बिहार स्टाईल गुंडगिरी – प्रशांत जगताप

Posted by - September 3, 2022 0
पुणे : गंगाधाम चौक येथे आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपचे आमदार व नगरसेवकांनी धाक – दडपशाही केल्याचा प्रसंग दोन दिवसांपासून…

Uddhav Thackeray : शिंदे गटातील बंडखोर आमदारांची ‘ती’ मागणी मान्य ; वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे

Posted by - July 28, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांची बंडखोरी , त्यानंतर घडलेले सत्ता नाट्य … यामुळे महाराष्ट्रात रोजच काहीतरी राजकीय डावपेच सुरूच असतात…

अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावा, भाजप किसान मोर्चाचे पुण्यात धरणे आंदोलन

Posted by - May 5, 2022 0
पुणे – राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आजपासून पुण्यातील साखर संकुल कार्यालयासमोर भाजप किसान मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन…

जितेंद्र आव्हाड प्रकरण : शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; “राजकीय हेतूने अशा कारवाया टाळाव्यात..! वाचा सविस्तर

Posted by - November 15, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड ढवळून निघाल आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे ते शांत होण्याचं नाव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *