मुंबई: ज्येष्ठ माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या आज 89 व्या जयंती निमित्त आज मुंबईमध्ये भव्य कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांची या कामगार मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली असून अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नरेंद्र पाटील यांनी निवडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्याची घोषणा केल्याबद्दल महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारचे मुख्यमंत्री मा.श्री.@mieknathshinde साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis साहेब यांचे मनःपूर्वक आभार!!
— Narendra Patil (Modi Ka Parivar) (@NarendraMathadi) September 25, 2022