Supriya And Sunetra

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

268 0

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha) तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका 7 मे रोजी पार पडणार आहेत. मात्र त्या अगोदर अजित पवार आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक अधिकाऱ्याने सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस पाठवली आहे.

का पाठवली नोटीस?
उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीची सगळी माहिती देणं आवश्यक असतं. या माहितीमध्ये तफावत असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील शॅडो रजिस्ट्रर खर्चात तफावत आढळली आहे.ही तफावत का आली याबाबत पुढच्या 48 तासांत खुलासा करण्याच्या सूचना निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांचा 28 एप्रिलपर्यंतचा 37 लाख 23 हजार 610 रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, उमेदवारांच्या खर्च प्रतिनिधीने दाखविलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केली. त्यावेळी त्यात एक लाख तीन हजार 449 रुपयांची तफावत आढळल्याचे नोटीसमध्ये उल्लेख आहे. उमेदवाराने दिलेला खर्च खरा आणि योग्य वाटत नसल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी 28 एप्रिलपर्यंतचा खर्च 29 लाख 93 हजार 31 रुपये इतका झाल्याचे दाखविले आहे. मात्र, खर्च प्रतिनिधीने दाखविलेला खर्च आणि शॅडो रजिस्टरशी तुलना करता हा खर्च जुळत नाही. त्यात नऊ लाख 10 हजार 901 रुपयांची तफावत आढळून आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News

Related Post

अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा कोल्हापूर पोलिसांनी घेतला ताबा

Posted by - April 20, 2022 0
मुंबई – मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळालेला आहे.…
Uddhav Thackeray

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

Posted by - April 3, 2024 0
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha) उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.यामध्ये कल्याण,जळगाव, पालघर, हातकणंगले या ठिकाणी…
SANJAY RAUT

मुक्काम वाढला : पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

Posted by - August 8, 2022 0
मुंबई  : खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणांमध्ये इडीच्या कस्टडीमध्ये आहेत . आज कस्टडीची मुदत संपत असल्याकारणाने त्यांना न्यायालयात…

“माझं विधान मराठा समाजाला खटकलं असेल तर मी मराठा समाजाची माफी मागतो…!” – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

Posted by - September 26, 2022 0
पुणे : काल एका जाहीर सभेत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, कि या सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळणारच, पण मराठा…

उमेश कोल्हे हत्याकांड : गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरे यांच्या फोनची होणार चौकशी; शंभूराज देसाई यांची सभागृहात माहिती

Posted by - December 23, 2022 0
नागपूर : उमेश कोल्हे हत्याप्रकरणी गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार असल्याची आज शंभूराज देसाई यांनी घोषणा केली. उद्धव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *