Palghar Crime

Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण

299 0

पालघर : पालघरमधून (Palghar Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दारूच्या नशेत तीन महिलांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विरार पश्चिममध्ये असलेल्या गोकुळ टाऊनशिप येथील एका रेस्टॉरंट आणि बारमध्ये ही घटना घडली आहे. एवढेच नाहीतर या महिलांनी दारूच्या नशेत पोलिसांना चावा देखील घेतला.

काय घडले नेमके?
विरार पश्चिमेला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये महिला दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचा फोन आल्यानंतर महिला पोलीस अंमलदार उत्कर्षा वंजारी व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र उलट दारूच्या नशेत असलेल्या या महिलांनीच पोलिसांशीच वाद घालण्यास सुरुवात केली. यातील एका 22 वर्षीय आरोपी महिलेनं उत्कर्षा वंजारी यांचा गणवेश पकडून त्यांना खाली ओढले, त्यानंतर त्यांना धक्काबुक्की केली. तिच्या तावडीतून सुटका करत असताना आरोपी महिलेनं त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला आणि कोपराला जोरात चावा घेतला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने पोलीस अधिकारी उत्कर्षा यांचे केस धरून ओढले.

उत्कर्षा यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या रेस्टॉरंटमधील कर्मचारी आकांक्षा भोईर यांना देखील या महिलांनी मारहाण केली. तिसऱ्या आरोपी महिलेनं देखील शिविगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर वाद सोडवण्यासाठी गेलेल्या हवालदार मोराळे यांना देखील या महिलांनी मारहाण केली आहे. त्यांच्या डोक्यात लोखंडी बादलीने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Sharad Pawar : ‘निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

महिन्याभरात होणार होतं लग्न… इमारतीखालीच आढळला होणाऱ्या बायकोचा मृतदेह; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

Posted by - March 18, 2023 0
सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असू होणाऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही आपलं आयुष्य संपवलं आहे.…

#Crime News : कोल्हापुरातील जयंती नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह; हत्या की घातपात, तपास सुरू …

Posted by - January 28, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरात आज एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे . कोल्हापुरातील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ एका महिलेचा…
Satara News

Satara News : पोलीस भरतीचं स्वप्न राहिलं अधुरं; धावण्याच्या सरावासाठी जाताना काळाने केला घात

Posted by - August 26, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Satara News) पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करण्यासाठी गेलेल्या दोन…
Cocain Seizes

थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले 1922 ग्रॅम कोकेन जप्त; दिल्ली पोलिसांची कारवाई

Posted by - June 16, 2023 0
नवी दिल्ली : थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले कोकेन डीआरआयच्या दिल्ली झोनल युनिटने जप्त केले आहे. या कारवाईत एकूण 1922 ग्रॅम…

पतीच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलात जेवायला गेलेल्या विवाहितेवर पाच जणांचा सामूहिक बलात्कार (व्हिडिओ)

Posted by - January 31, 2022 0
पुणे- पतीसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या गेलेल्या विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर गँग रेप केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *