Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

419 0

पुणे : देशासह राज्यातील 11 मतदारसंघात काल लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले होते. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशिर्वाद घेतले, तर रोहित पवारांनी मतदारसंघात अजित पवार गटाकडून पैसे वाटप व दमदाटी करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला होता. यादरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
रुपाली चाकणकर यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर चाकणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकवासाला परिसरातील एका मतदान केंद्रावर रुपाली चाकणकर गेल्या होत्या. सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी मतदान सुरु होण्याआधी त्यांनी औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात प्रवेश केला. त्यांनी ताटात दिवा, अगरबत्ती आदी पूजेचे साहित्य ठेवले होते. मतदान केंद्रात जाऊन त्यांनी तेथे ठेवलेल्या ईव्हीएम मशीनची विधीवत पूजा केली. मात्र या प्रकारमुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमाविरोधात आहे. यामुळे आचारसंहितेचा भंग होता. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यानेच याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांनकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!