Gunaratna Sadavarte

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

308 0

मुंबई : गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील या दोघांनाही सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. या दोघांचेही संचालकपद रद्द करण्यात आले आहे. सदावर्ते दांपत्य यापुढे तज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीत. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
4 ऑक्टोबर 2023 रोजी कामगार संघटनेने केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीत नमूद केले होते की, सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटत करण्यात आले नव्हते. त्यावर नथुराम गोडसे यांचे फोटो प्रिंट करण्यात आले होते.वास्तविक पाहता एसटी बँक, एसटी कर्मचारी यांचा या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता, असं या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे पूर्वी सर्व सभासदांना 14 दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणे आवश्यक होते. परंतु अशा कुठल्याही सूचना या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या. आपल्या मर्जीतील सभासद बोलवून, हवे त्या विषयांना मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. मुख्य म्हणजे पोटनियम बदलाची सुचना सभासदांना देणे बंधनकारक होते, असं तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, या ठिकाणी बँकेचे तज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती-पत्नीची निवड बेकायदेशीर रित्या करण्याचा ठराव आणला तो ठरावही सहकार खात्याने रद्द केल्यामुळे आता यापुढे सदावर्ते पती-पत्नी स्वीकृत संचालक म्हणून राहणार नाहीत. बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांमधून असावेत असेही प्रकारचा ठराव त्यांनी बेकायदेशीररित्या केला होता. या ठरावाला सहकार खात्याने नामंजूर केले आहे. एस टी बाहेरच्या लोकांना बॅंकेच्या सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आला आहे. या आणि अशा प्रकारच्या एकूण १३ बेकायदेशीर विषयांची तक्रार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती. यातील बहूसंख्य विषयांना स्थगिती देण्यात आली आहे. यापुढे सदावर्ते यांचा कुठलाही संबंध आता एसटी बँकेशी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते फुटले

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…
Pune Accident

Pune Accident : अपघाग्रस्त व्यक्तीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला धीर

Posted by - July 10, 2023 0
पुणे : आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान पुणे (Pune Accident) इथून मुंबईकडे जात असताना पुणे हद्दीतील काळेवाडी जवळील पुलावर दुचाकीवरून…

UDAYANRAJE BHOSALE : 3 डिसेंबरला रायगडावर आक्रोश आंदोलन

Posted by - November 28, 2022 0
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची अशी अवहेलना होत असते. तरीही त्याबद्दल कोणीही भूमिका मांडत नाही. महाराजांची अवहेलना केली म्हणून…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - February 12, 2024 0
पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *