Mumbai Police Death

Mumbai Police Death : मुंबईतील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं; तपासात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

455 0

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या (Mumbai Police Death) धक्कादायक मृत्यूमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलीस हवालदार विशाल पवार असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव होते. त्यांचा मृत्यू फटकमार टोळी आणि गर्दुल्यांनी विषारी इंजेक्शन टोचल्यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्यांच्या तपासात असा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे स्पष्ट केलं आहे. मोबाईल चोरांनी आणि नशेखोरांनी केलेल्या कथित हल्ल्यावेळी विशाल पवार घटनास्थळी नसल्याचं CCTV कॅमेऱ्याच्या तपासणीत उघड झालं आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ आणखीच वाढलं आहे.

विशाल पवार यांच्याबाबत नेमकं काय घडलं?
विशाल पवार यांचा बुधवारी ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी कोपरी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना एका टोळक्याने त्यांच्या हातावर कोयत्याने वार केले आणि मोबाइल घेऊन पळ काढला. त्यांनी त्यांला विषारी इंजेक्शन टोचल्याने ते बेशुद्ध झाले.रात्री 1 वाजेपर्यंत ते ट्रॅकजवळ पडून होते. यानंतर ते उठले आणि माटुंगा रेल्वे स्थानक गाठलं. येथून सकाळची ट्रेन पकडून साडेअकरा वाजता ठाण्यातील कोपरी येथील त्यांच्या घरी पोहचले. त्यानंतर रात्री त्यांना उलट्या होऊ लागल्याने त्यांच्या चुलत भावाने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं, असं कोपरी पोलिसांना सांगण्यात आलं. बुधवारी उपचारादरम्यान विशाल पवार यांचा मृत्यू झाला.

तपासासाठी 6 पथके तयार
विशाल पवार यांच्या मृत्यूने संपूर्ण पोलीस मोठा धक्का बसला असून खळबळ उडाली आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण दादर रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. दादर रेल्वे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Maharashtra Politics : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा

Pune News : बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी 7 मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Loksabha Election : काँग्रेसला मोठा धक्का ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याने घेतली माघार

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Share This News

Related Post

हिंजवडीमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला मुलीचा मृतदेह (व्हिडिओ)

Posted by - March 31, 2022 0
पिंपरी- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क जवळ मुळा नदी शेजारी अतिशय निर्जनस्थळी एका झाडावर एका मुलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली…
Nashik Crime

Nashik Crime : वडिलांना मारहाण केल्याचा धक्का सहन न झाल्याने तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - October 14, 2023 0
नाशिक : धार्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहरात (Nashik Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये…
Mumbai Pune Highway

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Posted by - January 17, 2024 0
पुणे: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai -Pune Expressway) वरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर कॉरिडॉरचे…

महत्वाची बातमी ! अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीच्या छापा ! मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच…
Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांकडून तिघांना अटक

Posted by - December 5, 2023 0
पुणे : महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *