नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Export) दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली असून आता सर्वच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार असून 40 टक्के निर्यातशुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली असून मेट्रिक टनाला 550 डॉलर किमान निर्यात मूल्य असणार आहे.
दि. 7 डिसेंबर 2023 ला निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसला होता. त्यानंतर NCEL च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती. मात्र अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नवीन निर्णय घेतला असून याचे निर्यातदारांकडून स्वागत करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या भावात 300 ते 500 रुपयांनी वाढ झालीय,केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाच शेतकऱ्यांनी स्वागत केल आहे,तर ही निर्यात बंदी कायमस्वरूपी हटवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा