छ. संभाजीनगर : मराठवाड्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे (Gangadhar Gade) यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या विषयी बोलायचे झाल्यास गंगाधर गाडे राजकारणात 70 च्या दशकात आले. त्यांनी दलित अत्याचार स्कॉलरशिप गायरान हक्कांसाठी ते लढले. विशेषत : नामांतराच्या लढ्यात ते अग्रस्थानी होते. नामांतराच्या लढ्यात त्यांनी अनेकदा तुरुंगवास सुद्धा भोगला होता.
काँग्रेसच्या कार्यकाळात ते राज्य परिवहनमंत्री होते. त्यांच्यावर उद्या सायंकाळी त्यांच्या शैक्षणिक संस्थेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा