मुंबई : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना (Weather Update) उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजही मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा त्रास सहन करावा लागू शकतो. याशिवाय येत्या काही दिवसांत राज्यातील काही भागात तापमानात मोठी वाढ होणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगडसह रत्नागिरी, सांगली, सोलापूरमध्ये 4 आणि 5 मे रोजी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 आणि 4 मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.