Atul Save

Atul Save : ओबीसी, एससी, एसटी आरक्षण रद्द करणार नाही याची हमी काँग्रेसने द्यावी; भाजप मंत्री अतुल सावे यांचे आव्हान

456 0

छत्रपती संभाजीनगर :- एससी,एसटी आणि ओबीसींचा आरक्षणाचा हक्क हिरावून ते आरक्षण अल्पसंख्यांकांच्या घशात घालण्याचा कॉंग्रेसचा मनसुबा असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे य़ांनी केला. काँग्रेसचे हे कुटील कारस्थान भारतीय जनता पार्टी ने उघड केल्यानंतर अद्याप कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे ,सोनिया गांधी, राहुल गांधी ,प्रियांका गांधी यांसारख्या प्रमुख नेत्यांनी स्पष्टीकरण का दिले नाही? धार्मिक आरक्षण देणार नाही अशी लेखी हमी काँग्रेस देणार का? काँग्रेसने कर्नाटकमध्ये ओबीसी आरक्षण मुस्लिमांना का दिले असा सवालही देखील भाजप चे मंत्री श्री अतुल सावे यांनी केले.

2006 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत मंत्री श्री अतुल सावे यांनी कॉंग्रेस आणि इंडी आघाडी चा खरा चेहरा उघड केला. यावेळी मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, डॉ.मनमोहन सिंग यांनी देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्य मुस्लीमांचा असायला हवा आणि त्यासाठी योजना आखाव्या लागतील असे म्हटले होते. त्याचाच पुनरुच्चार डॉ.मनमोहन सिंग यांनी एप्रिल २००९ मध्ये केला होता.कॉंग्रेस नेहमीच मुस्लीम अनुनयाचे राजकारण करते, हेच यातून दिसून येते. सच्चर समितीचा हवाला देत कॉंग्रेसने देशातील मुस्लीमांची स्थिती दलितांपेक्षा अधिक हलाखीची आहे असे चुकीचे चित्र रंगवून व्होट बँकेसाठी मुस्लीमांना झुकते माप दिले हा इतिहास सर्वश्रूत आहे असेही मंत्री सावे यांनी नमूद केले.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धार्मिक आरक्षणाला विरोध असताना कॉंग्रेसने त्यांच्या विचारांचा मान कधीच राखला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतरत्न म्हणून गौरव केला नाही.डॉ.आंबेडकरांचा निवडणुकांमध्ये पराभव करण्यासाठी अनेक प्रयत्न कॉंग्रेसने केले आहेत असेही मंत्री सावे म्हणाले.

सत्ता मिळाल्यानंतर कलम 370 लागू करण्याचे आश्वासन देणा-या कॉंग्रेसला 370 कलम हटवल्यामुळे काश्मीरमधील अनुसूचित समाजाची झालेली उन्नती नको आहे, त्यात खोडा घालण्यासाठीच कलम 370 लागू करायचे आहे, असेही ते म्हणाले.इतिहासातील आणि वर्तमानातील कॉंग्रेसच्या कृतीतून कॉंग्रेसचा मुस्लीमधार्जिणा चेहरा सर्वांसमोर आला आहे. कॉंग्रेसने राष्ट्रीय धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्य आयोगाचे गठन करण्याची खेळी हे त्यातीलच एक उदाहरण असल्याचे भाजप मंत्री सावे म्हणाले.

ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणातील 6 टक्के आरक्षण काढून घेऊन ते मुस्लीमांना देता यावे ही देखील चाल कॉंग्रेसचीच होती. १९८१ मध्ये एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हटवण्यासाठी ‘एएमयू सुधारणा कायदा’ कॉंग्रेसने आणला. २००९ च्या जाहीरनाम्यात नोक-या आणि शिक्षणात मुस्लीमांना राष्ट्रीय स्तरावर आरक्षण देण्याचे वचन देण्यात आले होते. ओबीसी आरक्षणामध्येच मुस्लीमांसाठी उप कोटा असावा अशी कॉंग्रेसची सुप्त इच्छा होती. कर्नाटकात देखील रातोरात मुस्लिमांना ओबीसी बनवून अनुसूचित समाजासाठीचे आरक्षण मुस्लीमांना देण्याचे षडयंत्र कॉंग्रेसचे होते आणि देशभरात हेच मॉडेल राबवायची काँग्रेस ची योजना आहे असे नमूद करत राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी काँग्रेसच्या मुस्लीम लांगूलचालनाच्या घटनांची यादीच सादर केली.

पुढे बोलतांना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, कॉंग्रेस आणि इडीने खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

कॉंग्रेस आणि इंडी आघाडी धार्मिक आरक्षण देणार नाही अशी लेखी हमी देणार का ?

कॉंग्रेसने अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी आणि जामिया मिलिया इस्लामिया सारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये एससी,एसटी,ओबीसी आरक्षण संपुष्टात का आणले ?

अनुसूचित समाजाच्या अधिकारांचे हनन होऊ नये म्हणून जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्यास कॉंग्रेसचे समर्थन नाही अशी लिखीत हमी देणार का ?

कॉंग्रेसने कर्नाटकमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मुस्लीमांना का दिले ?

व्होट बँकेच्या राजकारणामुळे धार्मिक आरक्षण देण्याच्या सुप्त अजेंड्यावर कॉंग्रेस खेळी करत आहे का ?

सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार आखून दिलेली आरक्षणाची मर्यादा संपुष्टात आणून कॉंग्रेस वाढीव आरक्षण कुणाला देऊ पाहत आहे ?

कॉंग्रेसने ओबीसी आयोगाला सांविधानिक दर्जा का दिला नाही ?

अनुसूचीत समाजाची संपत्ती हडपून कॉंग्रेसला ती अल्पसंख्यांकांना द्यायची आहे का ?

असे विविध प्रश्नाची उत्तर राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी काँग्रेसला विचारात त्यांना या प्रश्नांची उत्तर देण्याचे आवाहन दिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Mumbai Police Death : मुंबईतील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं; तपासात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Maharashtra Politics : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा

Pune News : बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी 7 मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Loksabha Election : काँग्रेसला मोठा धक्का ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याने घेतली माघार

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!