Akola News

Akola News : कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

504 0

अकोला : अकोल्यातून (Akola News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये कुलरचा वापर करणे एका 7 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. या घटनेमुळे मृत चिमुकलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांच्या मुलीचा घरात लावलेल्या कूलरजवळ खेळत असताना शॉक लागल्याने जागेवरच मृत्यू झाला आहे. युक्ती अमोल गोगे असं मरण पावलेल्या 7 वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. रविवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. युक्ती ही घरात लावलेल्या कुलरजवळ खेळत होती. त्यावेळी कुलरची एक वायर तुटून जाळीला चिकटली होती. त्यामुळे या जाळीला करंट होता. खेळता खेळता युक्तीचा हाथ कुलरला लागला आणि तिला जोरदार शॉक बसला.

ही बाब लक्षात येताच युक्तीच्या पालकांनी तिला दवाखान्यात नेले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जुने शहर पोलीसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Accident News : मिनी बस आणि स्कॉर्पिओमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Jharkhand ED Raids : काँग्रेस नेत्याच्या अडचणीमध्ये वाढ ! नोकराच्या घरी आढळले ‘एवढ्या’ कोटींचे घबाड

Kangana Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड सोडणार’, कंगना रणौतचे मोठे वक्तव्य

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या रमेश जाधवांनी घेतली माघार

Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर अजून कारवाई का केली नाही? काँग्रेसने केला ‘हा’ खुलासा

Maharashtra Weather Today : ऊन-पावसाचा खेळ सुरूच! एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसासोबत गारपिटीचा इशारा

Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला हिसंक वळण; यवतमाळमध्ये बस पेटवली

Posted by - October 28, 2023 0
यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा चौथा…
Sangli News

Sangli News : मिरजमध्ये युवा अभियंत्याने गणपतीसाठी साकारला 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा

Posted by - September 23, 2023 0
सांगली : सांगलीमधील (Sangli News) मिरज या ठिकाणी सुदन जाधव या अभियंत्याने घरातील गणपतीसमोर बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे. थर्मोकाल…
Pravin Darekar

Praveen Darekar : वसंतदादांच्या वेळी लोकशाही वेगळी होती का ? प्रवीण दरेकरांचा शरद पवारांना सवाल

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यानंतर सरकारमध्ये सहभागी होत, थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपने शिवसेनेनंतर पुन्हा…
dead

सोलापूर हादरलं ! आजीच्या डोळ्यासमोर 10 वर्षांच्या नातवाने सोडला जीव

Posted by - May 10, 2023 0
सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सोलापूरातील लष्कर विभागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. शांताराज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *