Punit Balan

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट

218 0

पुणे : मुलींच्या शिक्षणात अग्रेसर असलेल्या ‘एसएनडीटी कॉलेज’ला ‘इंद्रायणी बालन (Punit Balan) फाऊंडेशन’च्यावतीने 60 अद्ययावत संगणक नुकतेच भेट देण्यात आले. या संगणक लॅबचे उद्घाटन फाऊंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, मुख्याध्यापिका डॉ. अंजली कदम यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

युवा उद्योजक पुनीत बालन आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून देशभर मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, क्रिडा, संरक्षण या क्षेत्राचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्र हे विकासाचा पाया रचण्यात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी मदत केली जाते. याच उद्देशाने ‘एसएनडीटी’ कॉलेजसाठी संगणक देण्यात आले.

यावेळी बोलताना उपकुलगुरू चक्रदेव म्हणाल्या की, ‘‘या आद्ययावत संगणकांमुळे मुलींना अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मदत होणार आहे, याआधी संगणकांची संख्या कमी असल्यामुळे मुलींना संगणक शिकण्यासाठी कमी वेळ मिळायचा. पण आता ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने केलेल्या या अमूल्य मदतीमुळे मुलींना संगणक अधिक वेळ वापरता येईल. या मदतीबद्दल फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक आभारही मानले.

‘‘आजच्या ‘आयटी’च्या युगात संगणक शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रामुख्याने मुलींना प्रतिष्ठा, आत्मसन्मान मिळण्यासाठी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी हे शिक्षण गरजेचं आहे.‘एसएनडीटी कॉलेज’कडे पुरेसे संगणक उपलब्ध नसल्याने विद्यार्थीनांना संगणक शिक्षणासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी संगणक उपलब्ध करून देण्याची संधी आम्हाला मिळाली. या मुली येथे शिक्षण घेऊन जगात उंच भरारी घेऊन आपल्या शहराचं आणि देशाचं नाव उज्वल करतील असा विश्वास आहे.’’
पुनीत बालन
(अध्यक्ष, इंद्राणी बालन फाऊंडेशन)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

Share This News

Related Post

पुण्यातील ‘या’ कुख्यात गुंडानं घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ

Posted by - February 5, 2024 0
पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या घेतलेली भेटीवरून टीका होत असतानाच आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे…
Chitra Wagh

Chitra Wagh : राजकीय रंग द्यायचा नाही म्हणता… चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Posted by - September 3, 2023 0
पुणे : सध्या राज्यात जालना येथील मराठ्यांच्या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. यादरम्यान आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra…
Ajit And Sunetra Pawar

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Posted by - April 24, 2024 0
पुणे : शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी (Shikhar Bank Loan Case) अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह इतर आरोपींना क्लीन चीट…
Pune News

Pune News : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या हस्ते नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

Posted by - August 17, 2023 0
पुणे : विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *