पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील- परिवहन मंत्री अनिल परब

333 0

पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित वाहनांच्या रॅलीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते पर्यायी इंधन परिषदेच्या रॅलीचा नवीन कृषी मैदान येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भारत ससाणे, एमआयडीसीचे महाव्यवस्थापक अभिजित घोरपडे, प्रादेशिक अधिकारी संजीव अधिकारी संजीव देशमुख,अविनाश हदगल, एमसीसीआयएचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते.

पर्यावरण बदलांमध्ये गाड्यांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हे एक मोठे करण आहे. यामध्ये बदल करायचे असेल तर आपल्याला पर्यायी इंधनाकडे वळावे लागेल. या रॅलीमध्ये जवळपास ३५० इलेक्ट्रिकल वाहन सहभागी झाले आहेत. यावरुन आपली वाटचाल योग्यदिशेने सुरू असल्याचे लक्षात येते. या धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अशाप्रत्येक उपक्रमाला राज्यशासन प्रोत्साहन देईल, असे आश्वासन श्री. परब यांनी दिले.

पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल वाहनाच्या बॅटरीमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकल वाहन वापरण्याचे सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

पर्यावरण बदलाचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम तसेच इलेक्ट्रिकल वाहन धोरणाचा प्रसार-प्रचार करुन समाजात जनजागृती होण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे गिरबाले म्हणाले.

Share This News

Related Post

Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Posted by - March 25, 2024 0
अहमदनगर : आज सगळीकडे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी होताना दिसत आहे. मात्र यादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar Crime) एक धक्कादायक घटना…

सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग

Posted by - May 7, 2022 0
मुंबई- सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी…

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 9, 2022 0
नवी दिल्ली:राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ…

पुणे : खडकवासला धरणातून सायं. ६ वाजता मुठा नदी मध्ये २६ हजार ८०९ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग ; नदी पत्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी

Posted by - August 11, 2022 0
पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून संध्याकाळी ६ वा. २६ हजार…
Ram Satpute

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Posted by - March 25, 2024 0
सोलापूर : भाजपने लोकसभेसाठीची आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने आपल्या धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील युवा नेते राम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *