नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे नक्कीच तुमचा थरकाप उडेल. यामध्ये फुटबॉलच्या Live सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंडोनेशियातल्या बान्डुंगमध्ये फुटबॉलचा हा सामना सुरु होता. ही संपूर्ण दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय घडले नेमके?
इंडोनेशियातल्या मीडियाने दिलेल्या रिपोर्ट नुसार 10 फेब्रुवारीची ही घटना आहे. बान्डुंग मधल्या सिलिवांगी स्टेडिअममध्ये दोन लोकल क्लब्सदरम्यान फुटबॉलचा सामना रंगला होता. सामना सुरु होऊन पंधरा मिनिटं होऊन गेली होती. सामना रंगतदार होत होता. त्याचवेळी वातावरणात बदल झाला. आकाशात ढग दाटून आले आणि त्याचवेळी पहिल्यांदा वीज कोसळली. पण यात कोणतीही हानी झाली नाही. पण पुढच्याच क्षणाला दुसऱ्यांदा वीज कोसळली. पण यावेळी थेट मैदानात एका खेळाडूच्या अंगावर ती वीज पडली.
https://twitter.com/githii/status/1756606815033282759
या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. मैदानावर फुटबॉल सामना सुरु आहे आणि खेळाडू फुटबॉलवर ताबा मिळवण्यासाठी एकमेकांना भिडत असल्याचं या व्हिडिओ पाहिला मिळतंय. त्यावेळी एका खेळाडूच्या अंगावर अचानक वीज कोसळली. मोठा आवाज कोसळला आणि तो खेळाडू जागीच कोसळला. समोरचं दृष्य पाहून मैदानावरचे इतर खेळाडूंनी त्या खेळाडूकडे धाव घेतली. पण खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. आपल्या सहकाऱ्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूने संघावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार
Uddhav Thackeray : ‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
Pankaja Munde : राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला; पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडला हात
Nashik Firing : नाशिक हादरलं ! नाशिकमध्ये तरुणावर अंदाधुंद गोळीबार
Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?
Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन
Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा