नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅरेथॉनचा विश्वविक्रमवीर अॅथलिट केल्विन किप्टम (Kelvin Kiptum) याचा रविवारी पश्चिम केनियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला.तो अवघ्या 24वर्षांचा होता. केल्विन किप्टम याच्या कारमध्ये त्याचे प्रशिक्षक गेर्व्हाइस हकिझिमाना आणि आणखी एक महिला प्रवासीही होते. केल्विन किप्टमचे प्रशिक्षकांचाही कार अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात कारमध्ये बसलेली एक महिला प्रवासी जखमी झाली आहे.
काय घडले नेमके?
केल्विन किप्टम शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता पश्चिम केनियामधील कॅप्टेज ते एल्डोरेटला जात असताना त्यांची कार उलटली. पोलीस कमांडर पीटर मुलिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 11 च्या सुमारास झाला. गाडीत तीन जण होते. दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा