Pankaja Munde

Pankaja Munde : राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला; पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य

621 0

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी गाव चलो अभियानादरम्यान बीडमधील पौंडुळ गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. या संवादावेळी पंकजा मुंडे यांनी एक मोठे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावेळी गावाकऱ्यांनी पंकजा मुंडे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

नेमक्या काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला. माझा वनवास झाला. तुम्ही किती प्रेम करता हे पाहण्यासाठी हे सर्व झालं असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 2014 ची निवडणूक दुर्दैवानने आपल्यासाठी चांगली ठरली नाही. निवडून आल्यानंतर काही दिवसातच मुंडे साहेब आपल्यातून गेले. 2009 मध्ये मी राजकारणात आले आणि संघर्ष सुरू झाला. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या म्हणाले. बाबा यमराजापुढे अपयशी ठरले. जातीपातीचं राजकारण करायचं नाही असं त्यांनी सांगितलं. आपली जात वंचित आहे आणि त्यांच्यासाठी आपण काम करायचं आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

त्यांच्या या वक्तव्याने त्या नाराज असल्याचे समजत आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार असल्याने त्यांच्याकडे पक्षाकडून दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंकजा मुंडे यांना भाजप योग्य ती जबाबदारी देईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे भाजप त्यांना केंद्रात संधी देणार का? या चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडला हात

Nashik Firing : नाशिक हादरलं ! नाशिकमध्ये तरुणावर अंदाधुंद गोळीबार

Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!