Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

441 0

पुणे : कुख्यात गॅगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती एक महत्वाचा पुरावा लागला आहे.

काय आहे हा पुरावा?
शरद मोहोळ हत्याप्रकरणात मुख्य सूत्रधारांसह अन्य आरोपींच्या मोबाईच्या विश्लेषणातून पोलिसांच्या हाती सहा ऑडिओ क्लिप लागल्या आहेत. त्यामध्ये या गुन्ह्याच्या कटासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे. यातून या प्रकरणाशी संबंधित आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता असल्याचं तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी म्हटलं आहे.दरम्यान गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींच्या 19 हजार 827 ऑडिओ क्लीप आणि कॉल रेकॉर्डिंग मिळाले असून, त्यापैकी 12 हजार 320 क्लीपचे तांत्रिक विश्लेषण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये सहा महत्त्वाच्या ऑडिओ क्लीप्सचा तपास सुरू आहे. याशिवाय आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या सात गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

काय घडले होते नेमके?
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : राममंदिरानंतर आता पुणेकरांना पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे : सुनील देवधर

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं नाव अन् चिन्ह मिळताच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदावरून अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले ‘थोडी कळ सोसा…’

Job News : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात नोकरीची संधी; ‘या’ ठिकाणी पाठवा अर्ज

Eknath Shinde : शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार करणार शिवसेनेत प्रवेश

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर बारामतीमध्ये शाईफेक

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; कसा कराल अर्ज ?

Pune News : खळबळजनक ! स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून मधून फरार

Share This News

Related Post

Salim Kutta

Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण?

Posted by - December 18, 2023 0
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज ठाकरे गटाचे नाशिक शहराचे विद्यमान महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बडगुजर…

जिल्हा परिषदेच्या गट,गण रचना रद्द ! राज्य सरकारचा मोठा निर्णय

Posted by - March 16, 2022 0
पुणे- पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी नव्यानं निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या गटांची आणि पंचायत समितीच्या गणांची…
Sanjay and Sunil Raut

संजय राऊत यांना जवळच्या कार्यकर्त्याकडूनच धमकी? वाढीव सुरक्षेसाठी बनाव रचला?

Posted by - June 15, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)…

पुण्यायातील विश्रांतवाडी येथील आरटीओ ऑफीसला आग

Posted by - January 15, 2023 0
विश्रांतवाडी फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारामधे जप जप्त केलेली दहा वाहने मकर संक्रातीच्याच दिवशी जळून खाक झाली आहेत. कार्यालयाला रविवारमुळे…
Mumbai Firing

Mumbai Firing : मुंबईत दिवसाढवळ्या गोळीबार! 1 ठार तर 3 जण जखमी

Posted by - December 24, 2023 0
मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे (Mumbai Firing) मुंबई हादरली आहे. मुंबईतील चुनाभट्टीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *