काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमुक्त भारत (Uddhav Thackeray) अशी घोषणा भाजपची होती. पण आता कॉंग्रेसव्याप्त भाजप झाली आहे. काही वर्षांनी भाजपचा अध्यक्षदेखील कॉंग्रेसमधून आलेला असेल, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. संभाजीनगरच्या सभेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. भाडोत्री लोकं घेत आहेत, असा टोलादेखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
राज्यात सध्या ऑपरेशन लोटसची चर्चा सुरु आहे. 15 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र मध्ये येत आहेत. त्यावेळी कॉग्रेस माजी मंत्री आमदार अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू असून अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती समोर येत आहे. अशोक चव्हाणांसोबत असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजप नेत्यांची बोलणी सुरू आहे. काँग्रेसमधील मोठा गट फोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचे समजत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pankaja Munde : राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला; पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडला हात
Nashik Firing : नाशिक हादरलं ! नाशिकमध्ये तरुणावर अंदाधुंद गोळीबार
Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?
Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन
Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा