Pune News

Nashik Firing : नाशिक हादरलं ! नाशिकमध्ये तरुणावर अंदाधुंद गोळीबार

464 0

नाशिक : राज्यात गोळीबाराच्या (Nashik Firing) घटना सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात गोळीबाराची घटना घडली होती. त्याआधी मुंबईत दोन तर जळगावात गोळीबाराची एक घटना घडली आहे. आता नाशिकमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. मालेगावमध्ये तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. मालेगावच्या ओवाडी नाला या परिसरात ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन जणांचा खून करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता मालेगाव गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. तरुणावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. शहरातील नॅशनल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ओवाडी नाला भागात एका तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. इब्राहीम शेख असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी रमजानपुरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या तरुणाची हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!