#EXAMS : बारावी व दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश जारी

495 0

पुणे : जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक परीक्षा व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते २५ मार्च, २०२३ रोजी ८ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेदरम्यान झेरॉक्स दुकाने राहणार बंद; कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) २१ फेब्रुवारी ते २१मार्च २०२३ या कालावधीत तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या परीसरात व त्यासभोवतालच्या १०० मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित असलेले शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आदी वगळून इतर कोणत्याही खाजगी व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या परीसरात दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश संबंधित केंद्रावर परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांना लागू होणार नाहीत.

तसेच या परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील सार्वजनिक दूरध्वनी, एसटीडी, आयएसडी, बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्रे, ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, भ्रमणध्वनी, प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत. परीक्षा केंद्रांवर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॉझिस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप व तत्सम इतर साधने परीक्षा केंद्रावर जवळ बाळगण्यास व परिसराचे १०० मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास मनाई करण्याचा आदेश लागू करीत आहे. या आदेशाचे उल्लघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८ अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.

Share This News

Related Post

ज्या पत्राचाळ जामीन घोटाळ्यामुळे संजय राऊत चर्चेत आले ते पत्राचाळ प्रकरण आहे तरी काय ?

Posted by - July 31, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज सकाळीच ईडीचे पथक हजर झालं असून पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत…

‘देवाचो सोपूत घेता की…’ डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत यांनी घेतली कोकणी भाषेतून घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Posted by - March 28, 2022 0
पणजी- गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सावंत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली.…

महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा

Posted by - February 10, 2022 0
अमरावती- अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर बुधवारी झालेल्या शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

गोरखनाथ मंदिर हल्लेखोराचे आयएस कनेक्शन असल्याचा एटीएसला संशय

Posted by - April 5, 2022 0
लखनौ – उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर परिसरात रविवारी सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. हा हल्ला करणाऱ्या मुर्तजा…

सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे की पंकजा मुंडे; कोण होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री TOP NEWS मराठीच्या सर्व्हेत 10 हजार लोकांनी काय नोंदवलं मत ? वाचा सविस्तर

Posted by - December 3, 2022 0
Top News Survey Report : लहुजी वस्ताद यांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं, राज्यात जर महिला मुख्यमंत्री झाल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *