गोरखनाथ मंदिर हल्लेखोराचे आयएस कनेक्शन असल्याचा एटीएसला संशय

452 0

लखनौ – उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर परिसरात रविवारी सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. हा हल्ला करणाऱ्या मुर्तजा अब्बासी यांच्यासंदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांना आणि एटीएसला मिळालेल्या पुराव्यांमधून येत्या काळात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअर झालेल्या अहमद मुर्तझा अब्बासी दहशतवादी संघटना आयएसशी संबंधित असलण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या लॅपटॉपमधून पोलिसांना आयएस आणि सीरियासंबंधी काही व्हिडीओ मिळाले आहेत. मंदिरावर हल्ला करण्यापूर्वी तो नेपाळला जाऊन आल्याचं बोललं जातंय. अब्बासी जवळ मंदिराचा नकाशा देखील मिळाला असल्याचं म्हटलं जातंय. सध्या तपास यंत्रणांकडून याबाबत चौकशी सुरु आहे.

गोरखनाथ मंदिरातील सुरक्षा रक्षकांवरील हल्ला दहशतवादी कटाचा भाग असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली असून तशा प्रकारचे संकेत मिळत आहेत.
अब्बासी मुर्तजाच्या घरातील लोकांनी तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं म्हटलंय. मात्र, यासंदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अहमद मुर्तजा अब्बासी हा गोरखपूर येथील रहिवासी आहे. त्याच्यापासून लॅपटॉप आणि मोबाईल मिळाले आहेत. मीडिया रीपोर्टनुसार त्याच्या लॅपटॉपमधून आयएस संबंधित काही व्हिडीओ मिळाले आहेत. आता तपास यंत्रणांकडून अब्बासी जवळ फक्त व्हिडीओ आहेत की तो कोणत्या दहशतवादी संघटनेचा स्लीपर सेल आहे का याचा शोध घेतला जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार अब्बासीच्या मोबाईल फोनवर फतवे मिळाले आहेत. त्यानुसार तो शस्त्रासंह एकटाच हल्ला करण्यासंदर्भात इंटरनेटवर माहिती घेत होता. मुर्तजा अब्बासी एका छोट्या शस्त्रासह हल्ला करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार होता. सध्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी एटीएस आणि एसटीएफ मुंबईला पाठवण्यात आली आहे. मुंबईत मुर्तजाच्या संपर्कातील लोकांची चौकशी केली जाणार आहे.

राज्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी या घटनेत दहशतवादी कनेक्शन असू शकते असे म्हटले आहे. ही घटना म्हणजे गंभीर कटाचा भाग असू शकतो. यासंदर्भातील पुरावे मिळाल्यानंतर याला दहशतवादी हल्ला म्हणू शकतो. मंदिर परिसरात घुसलेल्या हल्लेखोराला वेळीच ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. जर तो मंदिरात घुसला असता तर मोठी घटना घडली असती, असं अवस्थी म्हणाले.

Share This News

Related Post

पायरी पुराण..! (संपादकीय)

Posted by - February 12, 2022 0
माझा पत्ता : पुणे महापालिका प्रवेशद्वार/वरून पाचवी पायरी माझा अल्प परिचय : रोज-दररोज माझ्या अंगावरून शेकडो जण पालिकेत ये-जा करत…

#CRIME NEWS : एकाच कुटुंबातील चौघांची हत्या की आत्महत्या ? त्याच कुटुंबातील तीन लहान मुले अद्याप बेपत्ता

Posted by - January 24, 2023 0
शिरूर : शिरूर चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत असलेल्या भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Posted by - April 14, 2022 0
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच…

मोठी बातमी ! मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख होणार

Posted by - April 18, 2022 0
नवी दिल्ली- लेफ्टनंट जनरल मनोज पांडे लष्करप्रमुख होण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्या जागी नियुक्त…

RAIN UPDATE : सर आली धावून, रस्ते गेले वाहून ; पुण्यात पावसाची धुवाधार बॅटिंग ; पुढील ३ तासात ‘या’ शहरांना पावसाचा जोरदार तडाखा

Posted by - September 30, 2022 0
पुणे : पुण्यात पावसानं धुवाधार बॅटिंगला सुरुवात केली आहे. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *