‘या’ तारखेपासून देशातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले जाणार, मात्र मास्क घालावा लागणार

609 0

नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे कमी होत असल्याचे आढळून आल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने जवळपास दोन वर्षांनंतर 31 मार्चपासून कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, मास्क घालण्याचे आणि सामाजिक अंतर राखण्याचे नियम लागू राहतील.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या 24 महिन्यांत जागतिक महामारीच्या व्यवस्थापनातील अनेक महत्त्वाचे टप्पे पार पडले. लसीकरण, रूग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विकास याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले. असे भल्ला म्हणाले.

ते म्हणाले की राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी देखील त्यांच्या क्षमता आणि प्रणाली विकसित केल्या आहेत आणि जागतिक महामारीच्या व्यवस्थापनासाठी त्यांच्या तपशीलवार विशिष्ट योजना लागू केल्या आहेत. गेल्या सात आठवड्यांत नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 22 मार्च रोजी कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 23 हजार 913 वर आली होती आणि संसर्गाचे प्रमाण 0.28 टक्के होते. देशात कोविड-19 विरोधी लसींचे 181.56 कोटी पेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत.

भल्ला यांच्या मते, लागू नियमांची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे आणि त्यानंतर गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतेही आदेश जारी केले जाणार नाहीत. ते म्हणाले की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड-19 चा सामना करण्यासाठी काही उपाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जसे की मास्क घालणे आणि हात स्वच्छ ठेवणे. आजाराचे स्वरूप पाहता लोकांनी अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे.

संसर्गाची प्रकरणे वाढल्यास, आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यानुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश स्थानिक पातळीवर त्वरित आणि सक्रिय कारवाई करण्याचा विचार करू शकतात.

Share This News

Related Post

वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर; पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी

Posted by - April 2, 2024 0
पुणे: वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाले असून यामध्ये पाच उमेदवारांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये पुण्यातून माजी नगरसेवक…
Jagdish Mulik

सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टी धारकांना मिळणार मोफत घर

Posted by - December 7, 2023 0
पुणे, 7 : डिसेंबर रस्ता रुंदीकरणामुळे विस्थापित झालेल्या सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टीधारकांना मोफत घर देण्याचे आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे कार्यासन…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी समीर थिगळे फेरनिवड

Posted by - April 20, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी समीर थिगळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते…

वज्रमूठ नाही….! १६ चोरांनी मिळून केलेली हातमिळवणी, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Posted by - April 4, 2023 0
देशातील १४५ पक्षांमधील सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. या टवाळांनी परवा सभा घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे…

“हे बंडखोर नव्हते, गद्दारच होते कारण…” आदित्य ठाकरेंची जोरदार टीका!

Posted by - July 21, 2022 0
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *